सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रसादाच्या नावाखाली सुरू होता आरोग्याशी खेळ! शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा छापा; 650 किलो प्रसाद जप्त, लाखोंचा साठा नष्ट
  • प्रसादाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक; शिर्डीत 650 किलो निकृष्ट पेढा केला नष्ट
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर ; अभिनेत्री हिना खानची संतप्त प्रतिक्रिया; सिया गोयलला थेट सवाल, ‘सत्य सांगणं इतकं कठीण होतं का?’
  • नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात दोषी भीमराव कांबळेला 29 जूनला शिक्षा सुनावली जाणार; ‘फाशीच योग्य’ असा सरकारी पक्षाचा युक्तिवाद
 क्राईम

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपी दोषी; भीमराव कांबळेवर मृत्युदंडाची मागणी;फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

डिजीटल पुणे    25-06-2026 11:50:26

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या अत्यंत संवेदनशील प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिलेल्या निकालात आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेले सर्व आरोप सिद्ध झाल्याचे नमूद करण्यात आले.

न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर शिक्षेबाबतची सुनावणी सुरू झाली असून सरकारी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने आरोपीला स्वतःच्या शिक्षेबाबत मत विचारले असता त्याने पुन्हा एकदा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायाधीशांनी गुन्हा सिद्ध झाल्याचे स्पष्ट करत त्याला शिक्षेबाबत भूमिका मांडण्यास सांगितले. यावर आरोपीकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आले नाही.

सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना आरोपीने विश्वासात घेतलेल्या बालिकेवर अत्यंत अमानुष अत्याचार केल्याचे सांगितले. वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांमधून गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट झाले असून आरोपीला कोणतीही दया दाखवू नये, अशी मागणी त्यांनी केली.

१ मे २०२६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय तपासणी, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या १५ दिवसांत सुमारे १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी संवेदनशीलता लक्षात घेऊन ‘इन कॅमेरा’ पद्धतीने घेण्यात आली. खटल्यादरम्यान ५५ हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत तपास, सुनावणी आणि निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने हा खटला राज्यातील सर्वात वेगाने निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी एक मानला जात आहे.आता न्यायालय आरोपीला नेमकी कोणती शिक्षा सुनावते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती