सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रसादाच्या नावाखाली सुरू होता आरोग्याशी खेळ! शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा छापा; 650 किलो प्रसाद जप्त, लाखोंचा साठा नष्ट
  • प्रसादाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक; शिर्डीत 650 किलो निकृष्ट पेढा केला नष्ट
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर ; अभिनेत्री हिना खानची संतप्त प्रतिक्रिया; सिया गोयलला थेट सवाल, ‘सत्य सांगणं इतकं कठीण होतं का?’
  • नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात दोषी भीमराव कांबळेला 29 जूनला शिक्षा सुनावली जाणार; ‘फाशीच योग्य’ असा सरकारी पक्षाचा युक्तिवाद
 शहर

पुणे शहरात एका दिवसात 8 गुन्ह्यांची नोंद; घरफोडी, ऑनलाइन फसवणूक, चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता

डिजीटल पुणे    25-06-2026 13:36:33

पुणे  : पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, ऑनलाइन फसवणूक, वाहन चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे शहर पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या 25 जून 2026 च्या दैनंदिन प्रेस नोटनुसार शहरातील विविध भागांत एकूण आठ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

विश्रांतवाडी परिसरात रेल्वे प्रवासादरम्यान एका प्रवाशाची बॅग चोरी करून सुमारे 1.72 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. तर कोंढवा परिसरात ऑनलाइन पेमेंट करताना एटीएम कार्डची माहिती मिळवून सायबर चोरट्यांनी 2.09 लाख रुपये परस्पर काढल्याची घटना उघडकीस आली आहे.

लोणी काळभोर परिसरात घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोनेरी दागिने असा सुमारे 1.81 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याशिवाय डेक्कन परिसरात घरातील कपाटातून 43 हजार रुपयांची चोरी झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल फोन हिसकावून नेण्याची घटना घडली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आर्थिक फसवणुकीच्या एका प्रकरणात कंपनीच्या नावाने बनावट सवलत योजना दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या सर्व प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू असून नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना तसेच घर आणि वैयक्तिक वस्तूंच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती