सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रसादाच्या नावाखाली सुरू होता आरोग्याशी खेळ! शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा छापा; 650 किलो प्रसाद जप्त, लाखोंचा साठा नष्ट
  • प्रसादाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक; शिर्डीत 650 किलो निकृष्ट पेढा केला नष्ट
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर ; अभिनेत्री हिना खानची संतप्त प्रतिक्रिया; सिया गोयलला थेट सवाल, ‘सत्य सांगणं इतकं कठीण होतं का?’
  • नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात दोषी भीमराव कांबळेला 29 जूनला शिक्षा सुनावली जाणार; ‘फाशीच योग्य’ असा सरकारी पक्षाचा युक्तिवाद
 जिल्हा

भिवंडीत अवैध गॅस साठवणुकीवर कारवाई; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त

डिजीटल पुणे    25-06-2026 16:59:54

भिवंडी : अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने भिवंडीतील मिठपाडा, पारोळ रोड परिसरात कारवाई करत दोन गाळ्यांमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्यस्तरीय दक्षता पथकाने पारोळ रोडवरील दोन गाळ्यांवर छापा टाकला. तपासणीदरम्यान कोणतीही वैध परवानगी नसताना मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गॅस सिलेंडरची साठवणूक करण्यात आल्याचे उघड झाले.कारवाईदरम्यान ५ किलो वजनाचे ६५३ भरलेले सिलेंडर, ५ किलो वजनाचे ९२ रिकामे सिलेंडर आणि १९ किलो वजनाचे ६ रिकामे सिलेंडर असा एकूण ७५० सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १२ लाख ८० हजार रुपये आहे.

याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.ही कारवाई उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी गौतम राऊत तसेच शिधावाटप निरीक्षक रविंद्र राठोड, राजीव भेले, विकास नागदिवे, राहुल इंगळे, अरुण काते, देवानंद थोरवे, राजेश सोरते आणि पवन कुंभले यांच्या संयुक्त पथकाने केली.अवैध गॅस साठवणुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याबरोबरच गॅसचा काळाबाजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणूक व वितरणाविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न, नागरी पुरवठा विभागाने दिला आहे.


 Give Feedback



 जाहिराती