सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टीईटी पेपर फुटी प्रकरण! मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, शिक्षक आमदार जयंत आंसगावकरांची मागणी
  • मोठी बातमी: महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचे सत्र! उद्या होणारी 'टीईटी' परीक्षा रद्द; ठाण्यातून पेपर जप्त, पोलीस ॲक्शन मोडमध्ये
  • टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला
  • सख्ख्या भावाचाही सियाविरोधात जबाब; 'केतनशी लग्न नको' असं कधीच सांगितलं नव्हतं, तपासाला नवं वळण
 विश्लेषण

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यंत्रणा सज्ज ;शिबिरातून काँग्रेसकडून बुथ संघटन बळकट करण्यावर भर

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    26-06-2026 10:46:06

उरण :  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील काँग्रेस पक्ष नव्या जोमाने संघटनात्मक बांधणीसाठी कार्यरत असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काँग्रेसची विचारधारा आणि पक्ष संघटना पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणे, त्यांच्याशी सातत्याने संवाद साधणे आणि रात्रंदिवस उपलब्ध राहून त्यांच्या अडचणी सोडविणारे प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची ओळख राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

 

त्याच अनुषंगाने, डॉ. श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पनवेल विधानसभा १८८ BLA-1 यंत्रणेमार्फत BLA-2 प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे.

 

या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार, SIR प्रशिक्षक ॲड. अरविंद कुमार द्विवेदी तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक  हरीश केणी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.प्रशिक्षणामध्ये मतदार यादीतील नावांची पडताळणी, नवीन मतदार नोंदणी, नावांमधील दुरुस्ती, मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना, BLA-2 ची जबाबदारी, बूथ व्यवस्थापन तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

डॉ. श्रुती श्याम म्हात्रे यांनी सांगितले की, पनवेल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथ सक्षम करणे, प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क मिळवून देणे आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत BLA-1 टीमच्या माध्यमातून बूथ स्तरावर संघटन अधिक बळकट करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे.

 

या कार्यक्रमाला नगरसेवक हरीश केणी, कार्याध्यक्ष शशिकला सिंग, उपाध्यक्ष चेतन म्हात्रे,अमित दवे, विलास म्हात्रे, जयवंत देशमुख, कॅप्टन.कलावत,सोनटक्के सर, डॉ.विजयकुमार चव्हाण, जोश जेम्स ,प्रदीप सुनखे, कुलदीप नेटके, स्वप्निल पवार, अभिजीत मुंडक्कल, सायरा मॅडम, सोनिया मॅडम यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवा दल, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, बूथ अध्यक्ष ,लोकशाही मानणाऱ्या विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

 

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती