सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : जातीवरुन वाद, खासदार मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी; म्हणाल्या, अभिमन्यू पवार स्वतःला Superior समजतात
  • लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
  • मान्सून पुन्हा सक्रिय! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; कोकण, मराठवाडा, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
 क्राईम

लोहगड हत्या प्रकरण : मध्यरात्री घटनास्थळी पोहोचले एसपी संदीप गिल; 'क्राईम सीन रिक्रिएशन'द्वारे तपासाला वेग

डिजीटल पुणे    26-06-2026 11:25:03

पुणे : बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल (२५) हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. गुरुवारी उशिरा रात्री लोहगड किल्ल्यावर जाऊन पोलिसांनी 'क्राईम सीन रिक्रिएशन' केले. या वेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून तपासाचा आढावा घेतला.

पोलिसांनी लोहगडावरील तिकीट घरापासून ते केतनला दरीत ढकलल्याचा आरोप असलेल्या ठिकाणापर्यंत संपूर्ण मार्गाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज, आरोपींच्या हालचाली आणि घटनास्थळावरील परिस्थिती यांचा परस्पर ताळमेळ लावत तपास करण्यात आला. तसेच मृतदेह सापडलेल्या ठिकाणाचीही बारकाईने तपासणी करण्यात आली.

याबाबत संदीप सिंह गिल यांनी सांगितले की, कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाची पाहणी आणि त्याचे प्रात्यक्षिक ही अत्यंत महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया असते. आरोपींवर न्यायालयात परिस्थितीजन्य पुरावे प्रभावीपणे मांडण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पोलीस कोठडीत असलेले आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चौकशीदरम्यान एकमेकांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. चेतनने केतनच्या हत्येचा आग्रह सियाने धरल्याचा दावा केला असून, सियाने तो फेटाळत संपूर्ण योजना चेतनचीच असल्याचा प्रतिदावा केला आहे. पोलिसांच्या मते, शिक्षा टाळण्यासाठी किंवा कमी करण्याच्या उद्देशाने दोघेही परस्परांवर दोषारोप करत असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या बचावासाठी सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना, प्रकरणाचा तपास सुरू असून त्यांची पक्षकार तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले. तसेच संविधानाने प्रत्येक आरोपीला न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार दिला असून, कायद्याच्या चौकटीत राहूनच बचाव केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती