सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : जातीवरुन वाद, खासदार मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी; म्हणाल्या, अभिमन्यू पवार स्वतःला Superior समजतात
  • लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
  • मान्सून पुन्हा सक्रिय! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; कोकण, मराठवाडा, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
 शहर

जीविधातर्फे ‘डॉ. हेमा साने स्मृती व्याख्यानमाला’ ;१ ते ३ जुलैदरम्यान पर्यावरण, संस्कृती आणि निसर्ग विषयांवर व्याख्याने

डिजीटल पुणे    26-06-2026 17:28:45

पुणे : जीविधा संस्थेतर्फे आयोजित १८ व्या हिरवाई महोत्सवाअंतर्गत 'डॉ. हेमा साने स्मृती व्याख्यानमाला' दि.१ ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. देशी वनस्पतींच्या लागवडीत नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

व्याख्यानमालेची सुरुवात बुधवार, दि.१ जुलै रोजी डॉ. मंदार दातार यांच्या 'डॉ. हेमा साने लिहायच्या तेंव्हा…' या विषयावरील व्याख्यानाने होईल. गुरुवार,दि.२ जुलै रोजी डॉ. महेश शिंदीकर 'आजही साधं राहता येतं…' या विषयावर मार्गदर्शन करतील. तर शुक्रवार, दि.३ जुलै रोजी डॉ. राहुल देशपांडे 'जाऊ देवाचिया गावा…' या विषयावर व्याख्यान देतील.सर्व व्याख्याने सायंकाळी ६.३० वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे  येथे होणार असून पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीविधा संस्थेतर्फे   राजीव पंडित,सौ.वृंदा पंडित यांनी केले आहे.

मागील वर्षी डॉ हेमा साने यांचे निधन झाले. त्या वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या. तसेच इंडॉलॉजी  हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. त्यांची अतिशय साधी व पर्यावरणस्नेही राहणी होती.  यावर्षीच्या व्याख्यानातून त्यांच्या कामाची आठवण करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.स्थानिक देशी वनस्पतींच्या लागवडीत लोकांचा सहभाग वाढावा यासाठी जीविधा तर्फे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला हिरवाई महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचे हे १८ वे वर्ष आहे,असे पंडित यांनी सांगितले. 

 


 Give Feedback



 जाहिराती