पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथक-२ ने मोठी कारवाई करत वडगाव शेरी परिसरातून सुमारे ३ लाख ६५ हजार ३३९ रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी २६ जून रोजी धन्वंतरी कॉलनी, वडगाव शेरी येथील एका गोदामावर छापा टाकला. या कारवाईत रामलाल उर्फ रमेश गायडराम देवासी आणि गणेश चंद्रकांत पटवा यांच्या ताब्यातून १,१५,११६ रुपयांचा पान मसाला, ३०,२२३ रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ, दोन मोबाईल फोन आणि २ लाख रुपयांची मारुती सुझुकी ओम्नी कार असा एकूण ३,६५,३३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व त्यांच्या पथकाने वडगाव शेरी परिसरातील धनश्री कॉलनी येथे सापळा रचून ही कारवाई केली. आरोपी गणेश चुकना याच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ₹1,95,100 किमतीचा पान मसाला, ₹20,233 किमतीचे तंबाखूजन्य पदार्थ, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि मारुती सुझुकी ईको कार असा एकूण ₹3,65,333 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (COTPA) कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस नव्हे तर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच जाहिरात प्रतिबंध, उत्पादन, साठवणूक व वितरणासंबंधी लागू असलेल्या कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-2 ने केली.