सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, 10 मुले गंभीर जखमी, एक मुलगा अडकल्याची भीती
  • एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार सचिन अहिर थेट शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
  • सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'
 क्राईम

नसरापूर प्रकरणाच्या निकालाचे स्वागत; महिलांवरील अत्याचारांविरोधात 'झिरो टॉलरन्स'ची गरज, 'शक्ती' कायदा तातडीने लागू करण्याची मागणी

डिजिटल पुणे    29-06-2026 17:52:03

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुकलीवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या अत्यंत वेदनादायी प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल हा न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारा आहे. अशा क्रूर आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या गुन्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत क्षमा असू शकत नाही. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे.

प्रत्येक महिला आणि मुलीची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असली पाहिजे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत 'शून्य सहनशीलता' हे धोरण प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेला शक्ती कायदा तातडीने लागू करून महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम कायदेशीर व्यवस्था उभी करावी.

या प्रकरणात पीडितेला न्याय मिळाला, ही दिलासादायक बाब असली तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिस यंत्रणेने अधिक सतर्क, संवेदनशील आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. राज्यात कायद्याचा धाक आणि गुन्हेगारांमध्ये शिक्षेची भीती निर्माण होईल, अशी ठोस अंमलबजावणी होणे हीच काळाची गरज आहे.

 

 

 

छोट्या जाहिराती

जाहिरात:

व्ही.पी. पॉलीफॅब प्रा. लि.

ॲक्रेलिक | पॉलीकार्बोनेट | PVC | PP | HDPE फॅब्रिकेशन

✔ औद्योगिक अधातू फॅब्रिकेशन

✔ ॲल्युमिनियम वर्कटेबल्स, मशीन गार्ड्स व कव्हर्स

✔ ट्रॉफी, स्मृतिचिन्हे, बॅजेस, लॅपटॉप स्टँड

✔ ॲक्रेलिक लेझर कटिंग, CNC राउटर वर्क

✔ 3D प्रिंटिंग, प्रोटोटाइप व LED फोटो फ्रेम्स

संपर्क: महेश कुगावकर

 9822501194 / 9689916013


 Give Feedback



 जाहिराती