सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, 10 मुले गंभीर जखमी, एक मुलगा अडकल्याची भीती
  • एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार सचिन अहिर थेट शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
  • सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'
 क्राईम

पुण्यात घरफोड्या, चोऱ्या आणि लूटमारच्या घटनांनी वाढवली चिंता; एका दिवसात ९ गुन्हे दाखल

डिजीटल पुणे    30-06-2026 15:19:30

पुणे : शहरात गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख कायम असून, २९ जून रोजी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. या गुन्ह्यांमध्ये घरफोडी, चोरी, जबरी चोरी, साखळी चोरी, वाहतूक अपघात तसेच प्रतिबंधित शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

1) कात्रजमध्ये दीड लाखांचे दागिने चोरी

कात्रज परिसरातील एका फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सुमारे 1.50 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) काळेपडळ येथे 1.82 लाखांचा ऐवज लंपास

काळेपडळ भागातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 50 हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण 1.82 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

3) हडपसरमध्ये मोबाईल व रोख रकमेची लूट

फोनवर बोलत असलेल्या तरुणाला दोघांनी अडवून मारहाण केली. त्याच्याकडील मोबाईल, घड्याळ आणि रोख रक्कम असा 13,700 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आला. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

4) अप्पा बळवंत चौकात महिलेची बॅग चोरी

शंकर महाराज मठ परिसरात एका महिलेची बॅग चोरीस गेली. बॅगेतील 30,500 रुपयांचे मंगळसूत्र, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

5) ताडीवाला रोडवरील हॉस्टेलमध्ये मोठी चोरी

ताडीवाला रोड येथील हॉस्टेलमधील खोलीतून चोरट्यांनी तब्बल 2.48 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

6) हडपसरमध्ये मंगळसूत्र हिसकावले

पीएमटी बसस्थानकाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे 1 लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.

7) वाघोलीत जवळपास 7 लाखांची घरफोडी

वाघोली परिसरातील घरातून अज्ञात चोरट्यांनी 6.95 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

8) लोणी काळभोरमध्ये अपघात प्रकरणी गुन्हा

लोणी काळभोर परिसरात भरधाव मोटारसायकल चालवताना झालेल्या अपघातात एका 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

9) येवलेवाडी परिसरात कोयतेसह टोळी ताब्यात

येवलेवाडी परिसरात पोलिसांनी कारवाई करत दोन युवक आणि दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयते आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली असून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शहरात प्रतिबंधित शस्त्रे बाळगल्याप्रकरणी काही जणांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित सर्व प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.पुणे शहरात घरफोडी, चोरी, मंगळसूत्र हिसकावणे आणि लूटमारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर आले असून, बहुतांश प्रकरणांमध्ये अज्ञात आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

 

 

 

छोट्या जाहिराती

जाहिरात:

व्ही.पी. पॉलीफॅब प्रा. लि.

ॲक्रेलिक | पॉलीकार्बोनेट | PVC | PP | HDPE फॅब्रिकेशन

✔ औद्योगिक अधातू फॅब्रिकेशन

✔ ॲल्युमिनियम वर्कटेबल्स, मशीन गार्ड्स व कव्हर्स

✔ ट्रॉफी, स्मृतिचिन्हे, बॅजेस, लॅपटॉप स्टँड

✔ ॲक्रेलिक लेझर कटिंग, CNC राउटर वर्क

✔ 3D प्रिंटिंग, प्रोटोटाइप व LED फोटो फ्रेम्स

संपर्क: महेश कुगावकर

 9822501194 / 9689916013

 


 Give Feedback



 जाहिराती