सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; सिया-चेतनने मित्रालाही सांगितला होता कट, बीडमधील तरुण पोलिसांच्या ताब्यात
  • स्टिंग एनर्जी ड्रिंकवर विधानसभेत जोरदार चर्चा; शाळांजवळ विक्रीवर बंदीचे निर्देश, तुकाराम मुंढेंची विधानभवनात उपस्थिती
  • महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि कठोर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय
  • राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!
 क्राईम

गिरगावातील हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; दोन लाखांच्या व्यवहारातून उघड झाले रॅकेट, दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत

डिजिटल पुणे    01-07-2026 11:36:52

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गिरगाव परिसरातील एका नामांकित हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात कथित हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी एक मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तर दुसरी बॉलिवूड आणि बंगाली मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सिनेसृष्टीशी संबंधित एका महिला मेकअप आर्टिस्टला अटक करण्यात आली असून, ती अभिनेत्रींना अनैतिक व्यवसायासाठी ग्राहकांशी संपर्क करून देत असल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन अभिनेत्रींसाठी एका ग्राहकासोबत तब्बल दोन लाख रुपयांचा व्यवहार निश्चित केला होता. प्रति अभिनेत्री एका रात्रीसाठी एक लाख रुपये असा सौदा ठरवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याच व्यवहाराच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत सुटका करण्यात आलेल्या मराठी अभिनेत्रीने ग्रामीण भागातून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने मुंबई गाठल्याचे समोर आले आहे. मात्र, कामाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा फायदा घेत आरोपीने तिला पैशांचे आमिष दाखवत या रॅकेटमध्ये ओढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, या रॅकेटमागे आणखी कोणते दलाल, मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती किंवा इतर संबंधितांचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे.

दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या दोन्ही महिलांची ओळख कायदेशीर कारणांमुळे मुंबई पोलिसांनी जाहीर केलेली नाही. तपास पूर्ण होईपर्यंत अधिकृत माहितीच्या आधारेच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती