पुणे : निवडणुकीत आश्वासन दिले ५०० स्वे फुटापर्यंत घरांना करमाफी चे, आणि आता केवळ महिलांना, तीही फक्त एक वर्षासाठी कर सवलत! या पद्धतीने केंद्रातील मोदी सरकारने सर्वांना घरे , दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट ही आश्वासने जुमला ठरली आहेत. राज्य सरकारने अडीच हजार रुपये लाडकी बहीण योजनेमध्ये देणार असे सांगितले होते, त्याच पद्धतीने ट्रिपल इंजिन मधील पुणे महानगरपालिका सत्ताधार्यांची त्यांचेच आश्वासन ही केवळ जुमलेबाजी होती हे आता उघड झाले आहे.
पाचशे स्क्वेअर फुटांमधील घरांमध्ये अनेक घरांवरती कर्ज असल्यामुळे ती घरे कमावत्या पुरुषांच्या नावाने आहेत. मुख्यत्वे त्यांना याचा फटका बसणार आहे. असंघटित क्षेत्रामध्ये काम करून घर बांधणाऱ्या कुटुंबांच्या बाबतीत हा भेदभाव करणे म्हणजे स्त्रियांवर अन्याय करणेच आहे. या निकषात महिला मालकांना झुकते माप देण्यामध्ये कुठलेही तार्किक कारण दिसत नाही. केवळ अशी सवलत घेऊ पाहणाऱ्यांची, लाभार्थी संख्या कमी व्हावी हा त्यामध्ये उद्देश दिसतो आहे.
याबाबत पालिकेतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सुद्धा तोंड उघडलेले नाही हे आश्चर्याचे आहे. पुणेकर नागरिकांनी या जुमलेबाजीचा जाब स्थानिक भाजप नगरसेवकांना विचारायला हवा.जाब विचारा भाजप नगरसेवकाला!