सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात २४ तासांत ११३ मिमी पावसाची नोंद, जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
 शहर

धायरीत ५ जुलैला एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलींना लाभ घेण्याचे आवाहन

डिजिटल पुणे    02-07-2026 16:17:15

पुणे : धायरी येथील पद्मावती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आणि नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे यांच्या सौजन्याने रविवार, ५ जुलै २०२६ रोजी एसटी स्मार्ट कार्ड (अर्धे तिकीट) नोंदणी व कार्ड वितरणासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० वाजता पद्मावती मंदिर परिसरात होणार असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय किशोर पोकळे यांच्या हस्ते होणार आहे.

या शिबिरात ६५ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना, तसेच १२ वर्षांवरील सर्व मुली व महिलांना एसटी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करून कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.आयोजकांनी पात्र लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, तसेच सकाळी १० वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

स्थळ : पद्मावती मंदिर, धायरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर, धायरी, पुणे – ४११०४१.


 Give Feedback



 जाहिराती