सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; सिया-चेतनने मित्रालाही सांगितला होता कट, बीडमधील तरुण पोलिसांच्या ताब्यात
  • स्टिंग एनर्जी ड्रिंकवर विधानसभेत जोरदार चर्चा; शाळांजवळ विक्रीवर बंदीचे निर्देश, तुकाराम मुंढेंची विधानभवनात उपस्थिती
  • महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि कठोर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय
  • राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!
 क्राईम

केतन अग्रवाल हत्या प्रकरण; सिया गोयल-चेतन चौधरीची पोलीस कोठडी आज संपणार, तपासातील महत्त्वाचे पुरावे न्यायालयात मांडणार

डिजिटल पुणे    03-07-2026 11:29:10

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असून, दुपारी अडीच वाजल्यानंतर त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायाधीश ए. एम. विभूते यांच्या न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार असून, तपासादरम्यान हाती लागलेले महत्त्वाचे पुरावे आणि पुढील तपासाची दिशा यावर पोलिसांकडून भूमिका मांडली जाणार आहे.

सिया गोयलच्या बाजूने अॅड. विपुल दूशिंग तर चेतन चौधरीच्या बाजूने अॅड. राधिकेश उत्तरवार आणि अॅड. राम शहाणे युक्तिवाद करणार आहेत. सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील राजश्री विरकुड मांडतील. दरम्यान, सियाने नवीन वकिलामार्फत बाजू मांडण्याचा निर्णय घेतल्याने यापूर्वी तिचे प्रतिनिधित्व करणारे अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी या प्रकरणातून माघार घेतल्याची चर्चा आहे.

गेल्या पाच दिवसांत लोणावळा पोलिसांनी दोन्ही आरोपींची विविध ठिकाणी नेऊन कसून चौकशी केली. कट रचल्याचा संशय असलेल्या पुण्यातील लुल्लानगर परिसरातील कॅफे आणि टेकडीवर जाऊन घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली. तसेच लोहगड किल्ल्यावर क्राईम सीन रिक्रिएशन करून आरोपींकडून घटनाक्रमाची पुनर्रचना करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपींचे मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवून डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यात आला. डिजिटल पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, कॉल आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास अधिक मजबूत केला आहे. याशिवाय, गुन्ह्यानंतर आरोपींनी कोणाशी संपर्क साधला होता का, याचाही तपास करण्यात आला.

या सुनावणीत पोलिसांकडून 'लास्ट सीन टुगेदर' ही थिअरी न्यायालयात मांडली जाण्याची शक्यता आहे. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हत्या होण्यापूर्वी केतन अग्रवाल हा सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यासोबत शेवटचा दिसल्याचा दावा पोलिसांकडून केला जाऊ शकतो.

दरम्यान, या हत्येच्या कटात आणखी एखाद्या व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याच अनुषंगाने दोन्ही आरोपींकडे चौकशी करण्यात आली असली, तरी संभाव्य तिसऱ्या व्यक्तीबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आतापर्यंत सियाच्या कुटुंबीयांसह लग्नाची मध्यस्थी करणारे मित्तल दाम्पत्य, तसेच आरोपींना विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब चालकाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी हत्येपूर्वी लोहगड परिसराची रेकी, पूर्वीही हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता का, हत्येच्या दिवशी वापरलेले कपडे, केतन अग्रवालचा हरवलेला पासपोर्ट, नव्या साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल पुरावे अशा अनेक महत्त्वाच्या बाबींची पडताळणी केली आहे. आता या सर्व तपासाच्या आधारे न्यायालय आरोपींना पुढील पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती