सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; सिया-चेतनने मित्रालाही सांगितला होता कट, बीडमधील तरुण पोलिसांच्या ताब्यात
  • स्टिंग एनर्जी ड्रिंकवर विधानसभेत जोरदार चर्चा; शाळांजवळ विक्रीवर बंदीचे निर्देश, तुकाराम मुंढेंची विधानभवनात उपस्थिती
  • महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि कठोर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय
  • राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!
 शहर

लोणी काळभोरमध्ये हृदयद्रावक दुर्घटना! उघड्या पाण्याच्या चारीत पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; निष्काळजीपणाप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

डिजीटल पुणे    03-07-2026 18:00:29

लोणी काळभोर: पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे कंत्राटदाराच्या कथित निष्काळजीपणामुळे दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदून ठेवलेल्या उघड्या चारीत पडून या बालकाचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मृत बालकाचे नाव सोहम लखन कसबे (वय २ वर्षे) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या निचरा कामासाठी खोल चारी खोदण्यात आली होती. अलीकडील पावसामुळे या चारीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गुरुवारी सोहम घरासमोर खेळत असताना तो नकळत या पाण्याच्या चारीत पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेड्स, इशारा फलक किंवा इतर सुरक्षा उपाय करण्यात आले नव्हते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्राथमिक तपासातही सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे कसबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात ठेकेदाराविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तसेच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती