सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा
  • तुकाराम मुंढेंच्या आदेशाला कोर्टात चॅलेंज, उच्च न्यायालयात याचिका दाखल; मनमानी, अधिकारांच्या गैरवापराचा आरोप
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
 शहर

पुण्यात बोगस हुक्का पार्लरवर काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई; ५७.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

डिजिटल पुणे    04-07-2026 16:05:26

पुणे : पुणे शहरात अवैध धंद्यांविरोधातील कारवाईला वेग देत काळेपडळ पोलिसांनी पिंपळे सौदागर परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बोगस हुक्का पार्लरवर धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ५७ लाख ८० हजार ३७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील एका फार्म हाऊसच्या मागील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या फ्लेवर्ड हुक्क्यांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार महेश शिंदे व अतुल पंढरकर यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान घटनास्थळावरून ३ चारचाकी, २ दुचाकी, १२ मोबाईल फोन, ८ हुक्का पॉट, तंबाखूयुक्त हुक्का फ्लेवर्स तसेच इतर साहित्य असा एकूण ५७,८०,३७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियंत्रण) अधिनियम, २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.ही कारवाई पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


 Give Feedback



 जाहिराती