सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
  • मुसळधार पावसामुळे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळली; एकाच कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य
  • पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना! खडकवासला धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण
 शहर

वाकड पोलिस ठाणे येथे डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल, ताथवडे, पुणे येथील माजी संचालक डॉ.अमोल आनंदराव गावंडे यांच्याविरुद्ध ₹४.९८ कोटींच्या अपहार आणि गोपनीय माहिती चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    06-07-2026 13:21:10

पिंपरी-चिंचवड — : डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल, ताथवडे, पुणेचे माजी संचालक अमोल आनंदराव गावंडे यांच्याविरुद्ध संस्थेच्या सुमारे ₹४,९८,६६,००० इतक्या निधीचा कथित अपहार, संस्थेची गोपनीय माहिती (डेटा) चोरणे तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) प्राप्त झालेल्या तपास अर्जावर प्राथमिक चौकशी केल्यानंतर ४ जुलै २०२६ रोजी हा गुन्हा नोंदविण्यात आला. संस्थेच्या वतीने अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, संस्थेला प्राप्त झालेल्या अंतर्गत लेखापरीक्षण (Internal Audit) अहवालामध्ये अमोल गावंडे यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा गंभीर गैरवापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार व मोठ्या रकमेचा अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३१६(४), ३१८(४), २४८, ३३६ आणि ३४०, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ४३, ६६ आणि ७२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा करीत असून, आर्थिक गैरव्यवहाराचे संपूर्ण स्वरूप उघड करणे तसेच चोरीला गेलेला डेटा परत मिळविणे, या दृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

 सूत्रांच्या प्राप्त माहितीनुसार, तपासात सहभागी होण्यासाठी पोलिसांनी अमोल गावंडे यांना अनेक वेळा समन्स बजावले आहेत. मात्र त्यांनी सातत्याने चौकशीस व तपासास प्रतिसाद दिलेला नाही आणि ते तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. सध्या ते भारताबाहेर गेले असून, ते दुबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे.


 Give Feedback



 जाहिराती