सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
  • मुसळधार पावसामुळे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळली; एकाच कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य
  • पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना! खडकवासला धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण
 शहर

इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने आळंदी शहरात प्रवेश चारही पूल पाण्याखाली

डिजिटल पुणे    06-07-2026 16:19:48

पुणे : पुणे जिल्ह्यात आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा साठी येणाऱ्या सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही.ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे व आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.

कृपया प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे.आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती