सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पावसाचा जोर ओसरताच खडकवासला धरणाच्या विसर्गात मोठी कपात; मुठा नदीत आता १८,२७१ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • मोशीत भीषण दुर्घटना! दोन मजली इमारत कोसळली; १४ ते १५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
  • पालखी सोहळा मुक्कामाची तयारी पूर्ण; भवानी पेठ आणि नाना पेठेतील विठ्ठल मंदिरे सज्ज
 शहर

पं.डॉ.विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष संगीत सोहळा १२ जुलै रोजी

डिजिटल पुणे    09-07-2026 10:58:01

पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ  शास्त्रीय गायक,संगीतज्ञ,लेखक आणि संवेदनशील गुरु पं.डॉ.विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त 'अमृतधारा' या विशेष सांगीतिक सोहळ्याचे आयोजन रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे करण्यात आले आहे.ओंकार आदिनाद फाउंडेशन आणि पं.कशाळकर यांच्या शिष्य परिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. 

 या कार्यक्रमात पं. कशाळकर यांनी रचलेल्या  बंदीश संग्रहाचे पुस्तक प्रकाशन आणि त्यांच्या सांगीतिक जीवन प्रवासावर आधारित विशेष माहितीपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.तसेच पद्मश्री पं.एम.व्यंकटेशकुमार यांच्या सुरेल शास्त्रीय गायनाने रसिकांना संगीताची अविस्मरणीय मेजवानी लाभणार आहे.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री सतीश आळेकर आणि पद्मश्री शेखर सेन उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, पद्मश्री सुरेश तळवलकर, पद्मश्री उल्हास कशाळकर आणि पं.अरुण कशाळकर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  व्याख्याते,अभिनेते राहुल सोलापूरकर करणार आहेत.

पं.डॉ.विकास कशाळकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात गायन,अध्यापन आणि लेखनाच्या माध्यमातून दिलेल्या बहुमोल योगदानाचा गौरव करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.त्यांच्या असंख्य शिष्यांच्या व संगीतप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगणार आहे.पं.डॉ.विकास कशाळकर यांच्या संगीतसाधनेचा, गुरुपरंपरेचा आणि सांगीतिक वारशाचा गौरव करणाऱ्या या विशेष सोहळ्यास पुण्यातील संगीतप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती