सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पावसाचा जोर ओसरताच खडकवासला धरणाच्या विसर्गात मोठी कपात; मुठा नदीत आता १८,२७१ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • मोशीत भीषण दुर्घटना! दोन मजली इमारत कोसळली; १४ ते १५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
  • पालखी सोहळा मुक्कामाची तयारी पूर्ण; भवानी पेठ आणि नाना पेठेतील विठ्ठल मंदिरे सज्ज
 शहर

मोशी दुर्घटना: मध्यरात्री 'व्हायब्रेशन टेस्ट'द्वारे अडकलेल्या कामगारांचा शोध; बचावकार्य युद्धपातळीवर, नियमांवरही प्रश्नचिन्ह

डिजिटल पुणे    09-07-2026 11:24:55

पिंपरी-चिंचवड: मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पातील प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळल्यानंतर बचावकार्य अखंड सुरू आहे. दुर्घटनेच्या वेळी इमारतीत 23 कामगार असल्याची माहिती असून, त्यापैकी 5 जण सुरुवातीलाच बाहेर पडले. तर आतापर्यंत 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अद्याप 8 ते 9 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बचाव मोहिमेदरम्यान मध्यरात्री जवानांनी अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने 'साउंड व्हायब्रेशन टेस्ट' केली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांकडून कोणताही प्रतिसाद मिळतो का, याची पडताळणी करण्यात आली. मात्र, या चाचणीत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने कचऱ्याचा ढिगारा हटवून आज सकाळी जवानांनी पहिल्या मजल्याच्या भिंतीला छिद्र पाडत कॅन्टीनमध्ये प्रवेश केला. सध्या कॅन्टीन आणि तळमजल्यावरील पार्किंग परिसरात अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू आहे.

घटनास्थळी भेट दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. काही कामगारांपर्यंत अन्न व पाणी पोहोचवण्यात आले असून, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथके प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून इमारतीचे अंतर, सुरक्षा भिंतीची क्षमता, कार्यालयाचे नियोजन आणि दुर्घटनेनंतर अडकलेल्या कामगारांच्या संख्येबाबत अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी माहिती दिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती