पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी,सुफी वारकरी विचार मंच,अवामी महाज,दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लि.,'महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर'च्या वतीने वारीमध्ये पुण्यात आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि औषध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दि मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक, रविवार पेठ शाखा येथे १० जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबीर सुरु रहाणार आहे.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आबेदा इनामदार,सचिव इरफान शेख,मुझफ्फर शेख,इफ्तेकार इनामदार,मशकूर शेख,उमर शरीफ शेख,बबलू सययद,नितीन गोरावडे इत्यादी संयोजन करीत आहेत.
पंढरपूर वारीनिमित्त पुण्यात सर्व धर्मीय ऐक्य दिंडी आयोजित करण्यात आली आहे.रिझवानी मस्जिद ट्रस्ट,डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठ,मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक,सुफी वारकरी विचारमंच आणि शिव महोत्सव समिती यांच्या विद्यमाने दि.१० जुलै रोजी सर्व धर्मीय ऐक्य दिंडीचे आयोजन सकाळी साडे दहा वाजता करण्यात आले आहे.साखळीपीर तालीम(नाना पेठ) येथे सर्वधर्मीय धर्म गुरु, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी च्या अध्यक्ष आबेदा इनामदार,शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार असून अंगरशा बाबा दर्गा मार्गे रिझवानी मस्जिद (गंज पेठ)येथे समारोप होणार आहे.दिंडीचे हे आठवे वर्ष आहे.
शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर,रिझवानी मस्जिद ट्रस्ट चे विश्वस्त अंजुम भाई,सुफी वारकरी विचार मंचचे अध्यक्ष मशकूर अहमद शेख,सचिव उमर शरीफ शेख,हाजी गुलाम आझम ट्रस्टचे विश्वस्त अब्दुल वहाब शेख ,बबलू सय्यद यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
'डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी 'च्या वतीने वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.हाजी गुलाम महंमद आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन,कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेकट्स, डिझाईन अँड आर्टस् च्या वतीने खिचडी वाटप करण्यात येणार आहे.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजन्मेन्ट च्या वतीने फळांचे वाटप करण्यात येणार आहे.डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठ एन एस एस युनिट,अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी,अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने प्रथमोपचार संचांचे वाटप करण्यात येणार आहे.