सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
 जिल्हा

देशातील सर्वात मोठ्या ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन सेंटरच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

डिजिटल पुणे    11-07-2026 17:48:58

नागपूर : अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शने, परिषदा याकरिता कन्व्हेंशन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर विख्यात होईल आणि नागपूर शहराला एक वेगळी ओळख त्यामुळे मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

दाभा गावालगत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या २१.७ हेक्टर जागेत राज्य सरकारतर्फे हे सेंटर उभारले जात आहे. विमानतळ, रेल्वे स्थानक यापासून अगदीच कमी अंतरावर हे सेंटर आहे. झिरो माईलपासून या सेंटरचे अंतर अवघे ७.८ कि.मी. आहे. चारही दिशांनी असलेली कनेक्टिव्हिटी हे या सेंटरचे वैशिष्ट्य आहे. सेंटरच्या बाहेरील भागात लँडस्केप, कारंजे राहतील. आतील भागात कॉन्फरन्स व सेमिनार हॉल, बोर्ड रूम, डायनिंग हॉल असेल. याशिवाय भव्य पार्किंग या ठिकाणी असणार आहे. दुचाकी, चारचाकींसह बससाठीही मोठी पार्किंग व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे.

२ हजार आसन क्षमतेचे ऑडिटोरियम हे येथील आणखी एक वैशिष्ट्य आहे. येथील सभागृह आकारमानाने देशातील सर्वात मोठे सभागृह असणार आहे. अग्निसुरक्षेच्या सर्व अत्याधुनिक उपाययोजना या ठिकाणी करण्यात येत आहेत. हा प्रकल्प उभारण्याची जबाबदारी एमएसआयडीसीला देण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता नरेश बोरकर यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. सध्या या प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, खा. मायाताई इवनाते उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती