सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
  • कोल्हापुरात धक्कादायक घटना; महिनाभराच्या चिमुकलीच्या बारशापूर्वीच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
  • टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
  • मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना
 शहर

भारतीय विद्या भवनमध्ये १८ जुलै रोजी युवा गायक वर्धन पेंढरकर यांचा ‘भक्तिरंग’ कार्यक्रम

डिजिटल पुणे    13-07-2026 16:30:17

पुणे : भारतीय विद्या भवन, पुणे केंद्र आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘भक्तिरंग’ या भक्तिसंगीताच्या  मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे  सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे  होणार आहे.या कार्यक्रमात युवा गायक वर्धन पेंढरकर विविध संतांच्या रचना, अभंग आणि भक्तिगीते सादर करणार आहेत. 

वर्धन पेंढरकर यांना संवादिनीवर सोहम ताटे, तबल्यावर केदार टिकेकर आणि तालवाद्यावर रोशन वाघोड यांची साथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन सौ. वैशाली जोशी करणार आहेत.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे भारतीय कला, संस्कृती आणि परंपरांच्या जतनाला सातत्याने प्रोत्साहन मिळत असून, या मालिकेतील हा २९७ वा कार्यक्रम आहे.या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून सर्व रसिकांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन भारतीय विद्या भवन चे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी  केले आहे.भारतीय भक्तिसंगीत परंपरेचा समृद्ध वारसा रसिकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार असून, संगीतप्रेमींना भक्तिरसाचा  अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.                               


 Give Feedback



 जाहिराती