सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावती कारला आग, सर्व गाड्या सोडून पळाले, भुयारात धुराचे मोठे लोट वाहतूक बंद!
  • पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; जुन्या गुन्ह्याशी कनेक्शनची चर्चा
 जिल्हा

मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला भीषण आग; धुरामुळे प्रवासी गाड्या सोडून बाहेर पळाले, वाहतूक ठप्प

डिजिटल पुणे    15-07-2026 14:37:33

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवरील हाजी अली-वरळी दरम्यानच्या बोगद्यात बुधवारी दुपारच्या सुमारास धावत्या कारला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. काही क्षणांतच कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि संपूर्ण बोगद्यात दाट धुराचे लोट पसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने बंद करण्यात आली.

दुपारी सुमारे १२.२५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. बंदिस्त बोगद्यात धूर वेगाने पसरल्याने वाहनचालक आणि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी आपापली वाहने जागेवरच सोडून बाहेर धाव घेतली. काही काळ बोगद्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी त्वरित कारवाई केली. तसेच बोगद्यातील व्हेंटिलेशन आणि धूर बाहेर काढणारी यंत्रणा सुरू करण्यात आली, त्यामुळे धूर कमी करण्यास मदत झाली.

या घटनेमुळे कोस्टल रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली. आग लागलेल्या कारच्या मागे शेकडो वाहने अडकून पडली होती. रस्ता अरुंद आणि वाहनांची गर्दी असल्याने अनेक चालकांना गाड्या मागे घेणेही शक्य झाले नाही. परिणामी काही नागरिकांनी गाड्या तशाच सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र संबंधित कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात असून नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. तसेच बोगद्यातील सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती