पुणे : खराडी येथे 'एनआयओ आईज प्लस' या नव्या अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉ.श्रीकांत केळकर,सौ.अरुणा केळकर,संचालक डॉ.आदित्य केळकर,डॉ.जाई केळकर यांच्या हस्ते झाले.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर सर्वसमावेशक,अत्याधुनिक उपचार येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्णांच्या नेत्र आरोग्यासाठी आधुनिक निदान यंत्रणा आणि उपचार तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले आहे. नागरिकांसाठी नेत्ररोगांविषयी जागृतीची गरज असून दि. ३१ जुलै पर्यन्त या रुग्णालयामध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार, डोळे कोरडे पडणे (ड्राय आयज) आणि लेसरद्वारे चष्मामुक्ती शस्त्रक्रियाविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.डोळ्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास दृष्टिदोष कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. मात्र, वेळेवर निदान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झालेला सातत्यपूर्ण प्रगतीमुळे बहुतांश नेत्ररोगांवर प्रभावी उपचार योग्य प्रकारे करता येऊ शकतात', असे प्रतिपादन 'एनआयओ आईज प्लस'चे संचालक डॉ. आदित्य केळकर यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
डोळ्यांचे विकार, डोळ्यांच्या उपचारपद्धती, आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठे झालेले बदल तसेच अश्रू, मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विकार, कॉर्नियाचे आजार तसेच चष्मामुक्तीच्या शस्त्रक्रिया आदी अत्याधुनिक उपचार यांची माहिती त्यांनी दिली . अनेक रुग्णांना कमी खर्चात उपचार देण्याचा त्यांचा दीर्घ अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विकार, डोळे कोरडे पडणे, आधुनिक लेसिक, डोळे वाकडे होणे, अंधुक दिसणे किंवा डोळ्यामध्ये सतत त्रास जाणवत असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सामान्यांच्या दृष्टीच्या आजारांचे निदान झाल्यास त्यावर अधिक चांगला उपचार करता येतो आणि यामध्ये वेळेचे मोठे महत्त्व आहे.,असे डॉ.जाई केळकर यांनी सांगितले.