सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावती कारला आग, सर्व गाड्या सोडून पळाले, भुयारात धुराचे मोठे लोट वाहतूक बंद!
  • पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; जुन्या गुन्ह्याशी कनेक्शनची चर्चा
 विश्लेषण

फक्त बोला, AI करेल बाकीचं काम! तुकाराम मुंढेंचा FDA चा नवा उपक्रम; तक्रार नोंदवणं झालं आणखी सोपं

डिजीटल पुणे    16-07-2026 13:07:35

मुंबई : राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) सातत्याने कठोर कारवाई करत आहे. या मोहिमेला आणखी प्रभावी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांसाठी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित तक्रार नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना आता फक्त बोलून तक्रार नोंदवता येणार आहे.

मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला... तक्रार आपोआप तयार होणार

या AI-सक्षम पोर्टलवर नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आपली तक्रार बोलून सांगू शकतात. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित माहिती व्यवस्थित स्वरूपात तयार करून ती संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवते. तक्रारीच्या प्रक्रियेत विलंब झाल्यास स्वयंचलित एस्कलेशनची सुविधाही उपलब्ध असून नागरिकांना तक्रारीची संपूर्ण स्थिती ऑनलाइन ट्रॅक करता येणार आहे.

भेसळयुक्त अन्न आणि बनावट औषधांविरोधात नागरिकांची थेट साथ

भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांची माहिती नागरिक या पोर्टलद्वारे सहज देऊ शकतात. या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढवून आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर अधिक प्रभावी कारवाई करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे.

'प्रत्येक तक्रार महत्त्वाची, प्रत्येक नागरिकही महत्त्वाचा'

तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, सुशासन म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नव्हे, तर शासन अधिक सुलभ, जलद आणि उत्तरदायी बनवणे होय. AI-आधारित हे व्यासपीठ त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असून प्रत्येक तक्रारीला गांभीर्याने हाताळले जाईल. त्यांनी नागरिकांना भेसळ आणि बनावट औषधांविरोधात पुढे येऊन या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले.


 Give Feedback



 जाहिराती