पुणे : खराडी येथील 'एनआयओ आईज प्लस' सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दि.१२ जुलै २०२६रोजी ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.श्रीकांत केळकर,सौ.अरुणा केळकर,संचालक डॉ.आदित्य केळकर आणि डॉ.जाई केळकर यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. दि.३१ जुलैपर्यंत हे शिबीर सुरु राहणार आहे.मोतीबिंदू,काचबिंदू,मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार,डोळे कोरडे पडणे (ड्राय आयज), दृष्टीदोष तसेच लेसरद्वारे चष्मामुक्ती शस्त्रक्रियेबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
'डोळ्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास दृष्टिदोष कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो.मात्र,वेळेवर निदान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झालेला सातत्यपूर्ण प्रगतीमुळे बहुतांश नेत्ररोगांवर प्रभावी उपचार योग्य प्रकारे करता येऊ शकतात',असे प्रतिपादन 'एनआयओ आईज प्लस'चे संचालक डॉ.आदित्य केळकर यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
डोळ्यांचे विकार,डोळ्यांच्या उपचारपद्धती,आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठे झालेले बदल तसेच अश्रू,मोतीबिंदू,काचबिंदू,रेटिना विकार,कॉर्नियाचे आजार तसेच चष्मामुक्तीच्या शस्त्रक्रिया आदी अत्याधुनिक उपचार यांची माहिती त्यांनी दिली.मोतीबिंदू,काचबिंदू,रेटिना विकार,डोळे कोरडे पडणे, आधुनिक लेसिक,डोळे वाकडे होणे,अंधुक दिसणे किंवा डोळ्यामध्ये सतत त्रास जाणवत असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.सामान्यांच्या दृष्टीच्या आजारांचे निदान झाल्यास त्यावर अधिक चांगला उपचार करता येतो आणि यामध्ये वेळेचे मोठे महत्त्व आहे,असे डॉ.जाई केळकर यांनी सांगितले.