सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
  • एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
 जिल्हा

वरिष्ठांच्या त्रासाचा आरोप; नांदेडमध्ये ZP शिक्षकाने दोन मुलांसह नदीत झोकून दिली कार, व्हॉट्सॲप स्टेटसनंतर खळबळ

डिजिटल पुणे    17-07-2026 15:30:02

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह कार नदीपात्रात झोकून देत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून शिक्षकांवरील वाढत्या तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. आमदुरा येथील पुलावरून कार थेट नदीपात्रात गेल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. दीर्घ प्रयत्नांनंतर नदीतून कार बाहेर काढण्यात आली.

कारमधून शिक्षक सुनील मोरे आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील कोटा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी घटनेपूर्वी व्हॉट्सॲप स्टेटसवर वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. व्हॉट्सॲप स्टेटसचा आशय, वरिष्ठांबाबतचे आरोप आणि या घटनेमागील नेमके कारण याचा तपास पोलीस करत आहेत. शिक्षकाच्या मृत्यूमुळे शिक्षण विभागातही मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती