सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
  • सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'
  • देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
  • देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
  • सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात प्रथम वर्ष कला विद्यार्थ्यांचे स्वागत; NEP-2020 मार्गदर्शनासह नव्या वर्षाची सुरुवात

डिजिटल पुणे    18-07-2026 16:12:06

पुणे  : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात कला शाखेतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष कला वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'सामूहिक उपदेशन व स्वागत समारंभा'चे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९:३० वाजता हा कार्यक्रम पार पडला. नवीन शैक्षणिक धोरण (NEP २०२०) आणि महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक स्व. बाबुरावजी घोलप साहेब यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली झाली. कला शाखेच्या समन्वयक व मराठी विभाग प्रमुख प्रा. अपर्णा पांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्व नवीन विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्वागत केले आणि कला शाखेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक व सह-शैक्षणिक उपक्रमांची रूपरेषा मांडली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संगीता जगताप या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयातील विविध उपक्रम तसेच NEP बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कटीबद्ध आहे असे त्या म्हणाल्या.

उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे यांनी आपल्या मनोगता कला शाखेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले महाविद्यालयातील विविध उपक्रमात त्यांनी आवर्जून सहभागी व्हावे असे सांगितले.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावरील विविध समित्या आणि सुविधांची माहिती देण्यासाठी विविध समितीच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. चंदा हासे यांनी प्रवेश प्रक्रिया आणि Open Elective विषयांची निवड कशी करावी याबद्दल माहिती दिली. डॉ. सुभाष वाव्हळ यांनी नवीन शैक्षणिक धोरण नुसार बदललेली परीक्षा पद्धती आणि प्रथम वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप समजावून सांगितले. विद्यार्थी विकास मंडळाचे उपक्रम व योजनांची माहिती डॉ. विजय घाडगे यांनी दिली. डॉ. अमृता इनामदार यांनी लैंगिक अत्याचार प्रतिबंध तक्रार समितीच्या कामकाजाविषयी व Open Elective संदर्भात माहिती दिली. तर डॉ. विद्या पठारे यांनी क्रीडा विभाग आणि अँन्टीरॅगिंग आणि शिस्त समितीच्या नियमावलीबाबत विद्यार्थ्यांना सजग केले. श्रीमती वंदना शिंदे यांनी शासनमान्य शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली.

डॉ.नागेश भंडारी यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले. कॅप्टन डॉ. विठ्ठल नायकवडी यांनी राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि ग्रंथालय सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. राणी भगत यांनी संशोधन व नावीन्य क्षेत्रातील संधींवर प्रकाश टाकला. प्रा. अपर्णा पांडे सांस्कृतिक विभाग आणि अंतर्गत मिळणाऱ्या विविध संधी व स्पर्धांविषयी सविस्तर माहिती देत NEP बाबतही मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला शाखेतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये डॉ. जितेंद्र वडशिंगकर, डॉ. क्रांती बोरावके, डॉ. रमाकांत कसपटे, डॉ. राजेंद्र सरोदे, डॉ. भरत राठोड, डॉ. विशाल पावसे, प्रा. मालतुमकर, प्रा. संतोष सास्तुरकर, डॉ. दिपाली चिंचवडे, प्रा. शर्मिला देवकाते, डॉ. राजेंद्र भोईवार, प्रा. नेहा बवले, प्रा. प्रणाली शितोळे आणि प्रा. अक्षय कामठे यांचा सक्रिय सहभाग होता.

कार्यक्रमाचे सुंदर छायाचित्रण श्री. प्रणित पावले यांनी केले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती सुरेखा चिंचवडकर, श्री. संतोष कुंभार, श्री. राजू लांडगे व श्रीमती भारती टांक यांची मदत झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शाखेतील भूगोल विभाग प्रमुख डॉ. रमाकांत कसपटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र वडशिंगकर यांनी मानले. या उपदेशन वर्गाला प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप आणि उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


 Give Feedback



 जाहिराती