सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल धन्यवाद, आजच्या आंदोलनाचं श्रेय सरन्यायाधीशांना; संजय राऊतांचा टोला
  • मोठी बातमी: अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार, जे.पी. नड्डा फक्त 10 मिनिटं भेटले
  • जंतरमंतरवर आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांचा लाठीचार्ज, इंटरनेट सेवा बंद, मोबाईल जॅमर्स सक्रिय, राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक
 जिल्हा

उरणमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती व कठोर कारवाईसाठी सहकार्याची ग्वाही

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    20-07-2026 10:51:15

उरण : आज नशामुक्त नवी मुंबई अभियान उरण मध्ये लीड करणारे दर्शन नाईक व प्रतिक अमृते यांनी नवी मुंबई न्हावा शेवा बंदर पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) विजय चौधरी यांची सदिच्छा भेट घेतली व उरणचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे स्वागत केले.

एसीपी विजय चौधरी हे सलग तीन वेळा 'महाराष्ट्र केसरी' किताबाचे मानकरी असून आपल्या शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष आणि जनहितैषी कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यशानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी म्हणूनही उल्लेखनीय सेवा बजावली आहे.

या भेटीदरम्यान उरण परिसरातील अमली पदार्थांचे व्यसन, ड्रग पेडलिंग तसेच युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अमली पदार्थांच्या विक्री व वितरणाविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासन व सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

यावेळी शाळा, महाविद्यालये तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये संयुक्तपणे अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम व मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या उपक्रमांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन एसीपी विजय चौधरी यांनी दिले.

सामाजिक सहभाग, जनजागृती आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून उरण परिसराला अमली पदार्थमुक्त करण्याच्या दिशेने ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


 Give Feedback



 जाहिराती