सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 राज्य

जंतरमंतर आंदोलनाचा 31 वा दिवस; अभिजीत दिपकेंचा एल्गार, आज ऐतिहासिक मोर्चाचा दावा

डिजिटल पुणे    20-07-2026 14:22:22

नवी दिल्ली: नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 31 वा दिवस आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, नंतर मर्यादित स्वरूपात केरळ भवनापर्यंत मोर्चा काढण्यास सशर्त परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.

सोनम वांगचूक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दिपके यांनी स्वीकारले आहे. सोमवारी सकाळी आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी, "आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघणार आहे," असा दावा केला. गेल्या काही वर्षांत लोकशाही कमकुवत करण्याचे प्रयत्न झाले, मात्र जंतरमंतरवरील आंदोलनाने लोकशाहीचा आवाज पुन्हा बुलंद केला असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरातून मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी होत असल्याचा दावा करत दिपके यांनी जंतरमंतर परिसरातील सर्व रस्ते आंदोलकांनी भरून गेल्याचे म्हटले. तसेच, कालपर्यंत मोर्चाला विरोध करणारे पोलीस आज मार्गाबाबत चर्चा करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत "मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी" अशा घोषणा दिल्या. आंदोलकांनीही "जय भीम, जय संविधान"च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.


 Give Feedback



 जाहिराती