सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 जिल्हा

संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    21-07-2026 12:35:27

मुंबई : संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ कोटी, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी २५ कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरसाठी ४१.७५ कोटी या तीन तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना एकूण ११५ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आराखड्यातील सर्व कामे उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेवून दर्जेदार पद्धतीने व टप्प्याटप्प्याने निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सहयाद्री अतिथी गृह येथे विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार चरण सिंग ठाकूर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच तीर्थक्षेत्रात नव्याने करण्यात येणाऱ्यां कामांमुळे स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळेल.

परभणी येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ रूपये कोटींचा विकास आराखड

परभणी येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ रूपये कोटी विकास आराखड्यामध्ये श्री संत जनाबाई जन्मस्थळ परिसरात सांस्कृतिक सभागृह, गोदावरी घाट विकास, दर्शन मंडप, उद्यान व सुशोभीकरण, पाथवे, मंदिर ते घाट सिमेंट काँक्रीट रस्ता, गोरक्षण इमारत, संरक्षक भिंती, जलनिस्सारण व्यवस्था, विद्युत सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सौरऊर्जा, सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, लँडस्केपिंग आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यामुळे वारकरी, भाविक आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून गंगाखेड हे संत जनाबाईंच्या आध्यात्मिक वारशाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होणार आहे

अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी

अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी रूपयांच्या कामांमध्ये श्री संत गाडगे महाराज स्मृती केंद्र कल्चरल व्हॅल्यू एज्युकेशन सेंटरचे उर्वरित बांधकाम, श्री संत गाडगे महाराज स्मृति भवन परिसरामध्ये शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटर तळमजल्याचे बांधकाम करणे, यात्री निवासाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम, कीर्तनासाठी सभागृह, समाधीचा जीर्णोद्धार व सौंदर्यीकरण, ध्यान केंद्रासाठी इमारत, कुंताबाई समाधीचे सौंदर्यीकरण, अंतर्गत रस्ते,पार्किंग, बगीचे,फर्निचर व इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी ४१.७५ कोटींची कामे

चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी ४१.७५ कोटींच्या कामांमध्ये  काटोल येथील भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर विकास आराखड्यात बहुउद्देशीय सभागृह, आधुनिक सार्वजनिक प्रसाधनगृह, भव्य प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, वाहनतळ, बगीचा, कमानी पूल, पाथवे आणि इतर पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या विकासामुळे महानुभाव पंथाच्या या ऐतिहासिक तीर्थक्षेत्रात भाविकांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा निर्माण होणार असून धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव डॉ के. एच. गोविंदराज, पोलीस महासंचालक सदानंद दाते, नागपूर, परभणी व अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित  होते.


 Give Feedback



 जाहिराती