सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 राज्य

कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'

डिजिटल पुणे    21-07-2026 12:56:16

नवी दिल्ली : नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावर सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर आणि कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या संसद मोर्च्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच सार्वजनिक भूमिका मांडली आहे. एनडीए संसदीय पक्षाच्या 'मंगल मिलन' बैठकीत बोलताना त्यांनी, "युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू देणार नाही. पेपर लीक करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल," असा स्पष्ट इशारा दिला.

पंतप्रधानांनी सांगितले की, पेपर लीक ही केवळ राजकीय चर्चा करण्याची बाब नसून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर समस्या आहे. पेपरफुटीची माहिती समोर येताच केंद्र सरकारने तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पुनर्परीक्षा वेळेत घेण्यात आली आणि निकालही विलंब न लावता जाहीर करण्यात आला, असे त्यांनी नमूद केले.

मोदी म्हणाले की, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत अधिक कडक आणि पारदर्शक यंत्रणा उभारली जाईल. पेपर लीकमध्ये सहभागी असलेल्या दोषींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, CJPच्या संसद मोर्चानंतर पक्षाच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. सूत्रांच्या माहितीनुसार, चर्चेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. मात्र, सरकारकडे मागण्या लिखित स्वरूपात सादर करण्याची सूचना करण्यात आली.

पेपर लीक हा कोणत्याही एका राज्याचा किंवा एका सरकारचा प्रश्न नसून संपूर्ण देशाच्या शिक्षण व्यवस्थेशी निगडित विषय असल्याचे सांगत, केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशी प्रकरणे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती