सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 शहर

जया जोग यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 'नक्षी स्वरलयीची'; भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशन सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

डिजिटल पुणे    21-07-2026 14:32:01

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ सतारवादक विदुषी जया जोग यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 'नक्षी स्वरलयीची' या विशेष संगीत सोहळ्याचे आयोजन शनिवार,दि.२५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे.

या विशेष कार्यक्रमात विदुषी जया जोग यांच्या स्वतंत्र रचनांचे सादरीकरण त्यांच्या शिष्य कलाकारांकडून करण्यात येणार आहे.या सादरीकरणात सतारवादनासाठी प्रज्ञा मेने,सुचेता गोसावी,बिना लिमकर,रिशान कुळकर्णी,स्वाती घैसास  आणि शताक्षी  पाळेकर सहभागी होणार आहेत.बासरीची साथ चक्रवर्ती पाळेकर तर तबल्याची साथ अक्षय पाटणकर करणार आहेत.यावेळी विदुषी जया जोग यांच्या संगीत प्रवासावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन  ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यगुरू डॉ.सुचेता चापेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी जया जोग (सतार),डॉ. नीलिमा राडकर ( व्हायोलिन) आणि निलेश देशपांडे (बासरी )यांचे सुरेल सहवादन रसिकांना अनुभवता येणार आहे. या सादरीकरणाला तबल्याची साथ अभिजीत बारटक्के करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन रंजना काळे करणार आहेत.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा २९८ वा कार्यक्रम असल्याची माहिती  भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.सर्वाना प्रवेश खुला आहे.


 Give Feedback



 जाहिराती