सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 क्राईम

पुण्यात धक्कादायक प्रकार! अश्लील व्हिडिओच्या धमकीने तरुणीचा छळ; प्रियकरासह चौघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    21-07-2026 14:57:13

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात एका २० वर्षीय तरुणीवर प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्य आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच तिचे खासगी व्हिडिओ चित्रीत करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत तिचा छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी वाघोली पोलिसांनी चार जणांविरुद्ध बलात्कार, गुन्हेगारी धमकी आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. फरहान रिझवान शेख (२०) आणि फजल शेख (२०, दोघे रा. विमाननगर) या दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तिसरा आरोपी साहिल दिंडोरे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. चौथा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीची ओळख फरहान शेख याच्याशी झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत आरोपीने नोव्हेंबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत वाघोली आणि खराडी परिसरातील विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, मुख्य आरोपीने आपल्या मित्रांनाही पीडितेवर अत्याचार करण्यास प्रवृत्त केले. तसेच या घटनेचे खासगी व्हिडिओ तयार करून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला सतत मानसिक दबावाखाली ठेवले.

दीर्घकाळ सुरू असलेल्या अत्याचार आणि धमक्यांना कंटाळून तरुणीने अखेर वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. तपासाच्या अनुषंगाने आरोपींचे मोबाईल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करून त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती