सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळित;चिखल अन् खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; उपाययोजनांची मागणी
  • आदित्य ठाकरेंचा मुंबईतील आंदोलनातून अभिजित दिपकेंना कॉल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे , दिपकेंचा निर्धार
  • गुजरात-आसाममध्ये पावसाचा तांडव; 872 गावे पाण्याखाली, लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत; IMD कडून रेड अलर्ट
  • : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
 क्राईम

पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत

डिजिटल पुणे    22-07-2026 12:34:16

पुणे : पुणे शहरातील नवले पूल परिसरात सुरू असलेल्या कथित देहव्यापारावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने मोठी कारवाई केली आहे. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी दोन लॉजवर छापा टाकत देहव्यापारासाठी आणलेल्या ९ महिलांची सुटका केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून आणखी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक येथील साई किरण लॉज आणि गॅलेक्सी लॉजमध्ये महिलांकडून देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली. खात्री पटताच दोन्ही लॉजवर धाड टाकण्यात आली.

या कारवाईत देहव्यापारासाठी आणलेल्या ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच राकेश राजू पाटोळे (२७, धायरी) आणि लॉज व्यवस्थापक मंगेश व्यंकट बनसोडे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आणखी एका संशयिताविरोधात आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ आणि त्यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे नवले पूल परिसरातील बेकायदेशीर देहव्यापाराच्या रॅकेटवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती