सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 शहर

अबंडन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तात्काळ पर्यायी रस्ता करा; अन्यथा शिवसेनेचे तीव्र जनआंदोलन – प्रमोद नाना भानगिरे

डिजिटल पुणे    22-07-2026 17:54:36

पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातील महादेववाडी येथील कृष्णानगर परिसरात असलेल्या अबंडन शाळेत शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना आजही जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे. शाळेकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खचलेला असून परिसरात कचऱ्याचे प्रचंड ढिगारे साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे पुणे महानगरपालिकेने केलेले दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी सुरू असलेला खेळ असल्याची टीका शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली.

रस्ता खाजगी जागेत असल्याचे कारण पुढे करून प्रशासन जबाबदारी झटकू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न सर्वोच्च प्राधान्याचा आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने तात्काळ पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, खचलेल्या मार्गाची सुरक्षित व्यवस्था करावी आणि परिसरातील कचऱ्याचे ढिगारे युद्धपातळीवर हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करावा. विद्यार्थ्यांच्या जीविताशी तडजोड करणारा निष्काळजीपणा शिवसेना कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.

 

 

या प्रश्नावर तातडीने कार्यवाही झाली नाही, पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही आणि परिसर कचरामुक्त करण्यात आला नाही, तर पुणे महानगरपालिकेविरोधात शिवसेना तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला.

 


 Give Feedback



 जाहिराती