सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 शहर

तुमच्यामुळेच मी राजकारणात आलो ; अजित पवारांच्या जयंतीनिमित्त अमोल कोल्हे भावूक, दिलीप सोपलांनीही व्यक्त केली खंत

डिजिटल पुणे    22-07-2026 18:08:34

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त राज्यभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सहा महिन्यांपूर्वी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत, "तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं," अशी मनोगत व्यक्त केली. दादांची शिस्त, विकासाभिमुख दृष्टी, वक्तशीरपणा आणि कार्यकर्त्यांप्रती असलेला जिव्हाळा कायम प्रेरणादायी राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, दरवर्षी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना दादांशी मनमोकळा संवाद व्हायचा. मात्र, यंदा त्यांच्याच जयंतीनिमित्त आदरांजली वाहावी लागत असल्याची वेदना शब्दांत मांडता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. "आजचा दिवस आनंदाचा असायला हवा होता, पण तुमची अनुपस्थिती मनाला चटका लावणारी आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, ठाकरे गटाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही सोशल मीडियावर अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करत, "दादा, तुमची उणीव शब्दांत व्यक्त करता येणार नाही," असे म्हटले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वीही दिलीप सोपल यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करत, "अजित दादा म्हणजे वेगळंच रसायन," असे म्हणत त्यांच्या नेतृत्वशैलीचे कौतुक केले होते. जयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देत त्यांनी दादांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला.

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्षांतील नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून सोशल मीडियावर त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती