सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळित;चिखल अन् खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; उपाययोजनांची मागणी
  • आदित्य ठाकरेंचा मुंबईतील आंदोलनातून अभिजित दिपकेंना कॉल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे , दिपकेंचा निर्धार
  • गुजरात-आसाममध्ये पावसाचा तांडव; 872 गावे पाण्याखाली, लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत; IMD कडून रेड अलर्ट
  • : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
 शहर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एमआयडीसीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

डिजिटल पुणे    24-07-2026 16:21:58

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसी परिसरात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, तहसीलदार स्वप्नील रावडे, कार्यकारी अभियंता विजय पेटकर यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, समाजहिताच्या उपक्रमांमधून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा हा एक अर्थपूर्ण प्रयत्न असून स्वच्छ व सुंदर बारामती घडविण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छतेची सवय अंगीकारावी, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले. श्री. पाटील म्हणाले, बारामती एमआयडीसी परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी उद्योग, कर्मचारी आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून नियमित स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उद्योग क्षेत्रात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करून पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.


 Give Feedback



 जाहिराती