सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'पाऊस
  • पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
  • मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
  • सोलापुरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू, 10 प्रवासी जखमी
  • रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी 7 वाजता रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
 शहर

मराठी चित्रपटांसाठी खुली होणार जागतिक बाजारपेठ; ४ ऑगस्टला विशेष कार्यशाळा;-Global Distribution, OTT आणि International Sales विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

डिजीटल पुणे    31-07-2026 11:23:36

पुणे: मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी आणि निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय वितरणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने, मीडिया शिपर्स यांच्या सहकार्याने ‘आता थेट जगाचं मार्केट!’ या विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (NFAI), लॉ कॉलेज रोड, पुणे येथे होणार असून प्रवेश विनामूल्य असणार आहे. मात्र, त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत Global Distribution, Content Licensing, OTT Platforms, Broadcast Rights, Theatrical Rights आणि International Sales या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठेत प्रभावीपणे कसे पोहोचवता येईल, याविषयी तज्ज्ञ प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.

याशिवाय चित्रपटांची नोंदणी प्रक्रिया, Metadata Management, आंतरराष्ट्रीय ग्राहक व वितरकांपर्यंत पोहोचण्याच्या पद्धती, तसेच विविध डिजिटल आणि जागतिक प्लॅटफॉर्मवर चित्रपट सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितली जाणार आहे.

भारतीय चित्रपट, मालिका आणि इतर ऑडिओ-व्हिज्युअल कंटेंटला जागतिक स्तरावर प्रेक्षक आणि वितरकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या मीडिया शिपर्स संस्थेचे तज्ज्ञ या कार्यशाळेत सहभागींसोबत आपला अनुभव आणि ज्ञान शेअर करणार आहेत.मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक तसेच चित्रपट क्षेत्रातील इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती