सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'पाऊस
  • पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
  • मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
  • सोलापुरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू, 10 प्रवासी जखमी
  • रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी 7 वाजता रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
 शहर

भिडे पुलाजवळ मुळा-मुठा नदीपात्रात पुरुषाचा मृतदेह; अपघात, घातपात की बुडून मृत्यू? पोलिसांचा तपास सुरू

डिजिटल पुणे    31-07-2026 16:53:26

पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरात शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. भिडे पुलाजवळील मुळा-मुठा नदीपात्रात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांसह अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांना सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात मृतदेह असल्याचा फोन आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

प्राथमिक तपासात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. संबंधित व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास डेक्कन पोलीस करत आहेत. अपघात, घातपात किंवा इतर कोणतीही शक्यता नाकारण्यात आलेली नसून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी करून पोलिस पुढील तपास करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती