सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'पाऊस
  • पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
  • मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
  • सोलापुरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू, 10 प्रवासी जखमी
  • रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी 7 वाजता रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
 जिल्हा

गडचिरोलीत दुर्दैवी घटना; नदीत बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू, एक विद्यार्थी थोडक्यात बचावला

डिजिटल पुणे    01-08-2026 17:58:38

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात शनिवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. राणी खेडेगाव येथे आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या चार शालेय विद्यार्थ्यांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी सुदैवाने बचावला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील अनेक नागरिक शेतात धान रोवणीच्या कामात व्यस्त असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थी गावाजवळील सती नदीवर आंघोळीसाठी गेले होते. नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात बुडाले. सोबत असलेल्या एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखल्याने त्याचा जीव वाचला.

या दुर्घटनेत लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (वय ६), कुणाल रमेश दूधकवर (वय ५) आणि मोहित हिवराज सराटे (वय ११) या तिन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

एकाच गावातील तीन निष्पाप मुलांचा अशा प्रकारे झालेला मृत्यू गावकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरला आहे. राणी खेडेगावासह संपूर्ण कुरखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती