सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील कोथरूड कथित भोंदू बाबा प्रकरणात मुख्य आरोपी दीपक खडकेचा जामीन पुणे न्यायालयाकडून रद्द
  • दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंड इथं अंत्यसंस्कार सुरू
  • शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
  • काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
  • मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
 जिल्हा

ब्रिज भूषण सिंग यांच्या निर्दोष मुकत्तेचा निर्णय अत्यंत दुर्दैवी ;अखिल भारतीय जनवादी महिला संघटना महाराष्ट्र राज्य कमिटीने केली नाराजी व्यक्त

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    04-08-2026 12:43:15

उरण : दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालाद्वारे महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले भाजपचे माजी खासदार ब्रिज भूषण शरण सिंग आणि सहआरोपी विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून महिला खेळाडूंना नाउमेद करणारा आणि अत्याचार करणाऱ्याना संजीवनी देणारा आहे, असे स्पष्ट मत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने व्यक्त केले आहे. सध्याच्या काळात इतर अनेक घटनात्मक संस्थाप्रमाणे प्रमाणे न्यायव्यवस्थेने सुद्धा आपले स्वातंत्र्य गमावले आहे की काय ही शंका या निकालाने बळावली आहे.   


सर्व क्षेत्रांत, आणि त्यातही क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी महिला खेळाडूंना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत प्रचंड सामाजिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शासन आणि न्यायव्यवस्थेने हे लक्षात घेतलेच पाहिजे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. 

मात्र त्याचबरोबर, या सर्व परिणामांची जाणीव असूनही हिमतीने आपल्यावरील लैंगिक अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि त्यांच्या बाजूचे अखेरपर्यंत उभे राहणारे त्यांचे पुरुष सहकारी बजरंग पुनिया यांच्या धैर्याला जनवादी महिला संघटना सलाम करीत आहे. या सर्वांची लढाई वाया जाणार नाही. या लढाईतून प्रेरणा घेऊन अत्याचार पीडिता अधिक हिमतीने पुढे येतील, अशी खात्रीही आम्ही व्यक्त करीत आहोत. असे मत या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

विनेश फोगाट हिने आपली लढाई सुरूच राहणार असल्याच्या केलेल्या व्यक्तव्याचेही आम्ही स्वागत करीत आहोत असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे  नसीमा शेख – राज्य अध्यक्ष ,प्राची हातिवलेकर – राज्य सचिव, हेमलता पाटील राज्य उपाध्यक्षा, सविता पाटील जिल्हा अध्यक्षा धनवंती भगत सेक्रेटरी, कुंदा पाटील सहसचिव लता पाटील, गीता पाटील रजनी पाटील, नयना म्हात्रे आदी महिला पदाधिकाऱ्यांनी न्यायायलयाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती