सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीकपात पूर्णपणे रद्द, खडकवासला धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठ्यामुळे मिटली चिंता
  • मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 विश्लेषण

वीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे आयोजित गुरुपौर्णिमा व १०८ वीरमाहेश्वर/वीरशैव कुटुंब सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

डिजिटल पुणे    04-08-2026 12:52:43

पुणे : वीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा व १०८ वीरमाहेश्वर/वीरशैव कुटुंब सन्मान सोहळा भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य श्री श्री १०८ डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या शुभहस्ते महाइष्टलिंग पूजनाने झाली.यानंतर वीरमाहेश्वर/वीरशैव कर्तव्यनिष्ठ कुटुंबप्रमुख महिला सन्मान अंतर्गत श्रीमती रूपाली कमाणे, श्रीमती वैशाली मिटकरी, सौ. वंदना गुपचूप, श्रीमती सुचेता वाडेकर, ॲड. सुनिता जंगम, श्रीमती विजया प्रकाश स्वामी, श्रीमती मंगला किन्नरी आणि सौ. संतोषी हिरेमठ यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ऋद्धी संतोष हिरोळी, श्रेयस वैजीनाथ स्वामी, अथर्व राजशेखर नवनी, गुरुमूर्ती अण्णा स्वामी, कृष्णदेव निगप्पा मुळे, गायत्री प्रविण स्वामी, वेदांत प्रविण स्वामी, अन्वय बसवराज मठपती, गणेश किशोर जंगम, वरद गणेश जंगम आणि ओम संजय कमाणे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वैशाली संजय भुंजे यांना तिरंदाजी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या १०८ वीरमाहेश्वर/वीरशैव कुटुंब सन्मान सोहळ्यात समाजातील विविध भागांतून आलेल्या कुटुंबांचा परमपूज्य डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. लहान मुले, युवक, पालक आणि ज्येष्ठ नागरिक अशा तीन पिढ्या एकत्र उपस्थित राहिल्याने सभागृहात भावनिक आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले.

यानंतर झालेल्या आशीर्वचनात डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत विशेषतः १०८ कुटुंब सन्मान सोहळा हा समाजात ऐक्य, संस्कार आणि कौटुंबिक मूल्ये दृढ करणारा अभिनव उपक्रम असल्याचे गौरवोद्गार काढले.

 

महाइष्टलिंग पूजेचे पौरोहित्य पुणे जिल्हा जंगम पौरोहित्य संस्थेचे युवा पौरोहित अक्षय स्वामी व सोमनाथ स्वामी यांनी केले. इष्टलिंग पूजेच्या नियोजनासाठी पौरोहित्य संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ हिरेमठ व जयवंत येडेकर यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व्हीएमजेएसचे मुख्य समन्वयक भीमाशंकर पोहेकर यांनी केले. अन्नदान व देणगी स्वरूपात संस्थेच्या अनेक सदस्यांनी उदार योगदान दिले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेश कुगावकर, उपाध्यक्ष सुभाष भस्मारे, पराग जंगम, सागर किन्नरी, सुनील वनपत्रे, काशिनाथ हिरेमठ, शंकर वसेकर, शिवलिंग जंगम (धायरी), शिवलिंग जंगम (नरे), सोमनाथ भातकुटे, उमेश कमाणे स्वामी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, महिला आघाडी, युवक आघाडी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला आघाडीमध्ये वर्षा कुगावकर, विद्याताई भस्मारे, शिल्पा जंगम, अंजली वसेकर, वंदना गुपचूप, संगीता जंगम, साधना वनपत्रे, जयश्री हिरेमठ, स्वरूपा कमाणे स्वामी, उज्वला किन्नरी, प्रियांका स्वामी, प्रियांका स्वामी भातकुटे, पल्लवी स्वामी भस्मारे, अमृता कुगावकर, अनिता जंगम, अश्विनी स्वामी, सुनंदा वसेकर, रूपाली कमाणे, वैशाली मिटकरी, सुलोचना लोखंडे, अनुराधा नवनी, निलीमा लोखंडे, सुचेता वाडेकर, पूजा स्वामी, गौरी स्वामी, वैभवी वनपत्रे, पूजा मंदार जंगम, जयश्री जंगम, संतोषी हिरेमठ, शोभा आरणकर, साक्षी जंगम, ऋती कमाणे, श्वेता हिरेमठ, श्रेया हिरेमठ, सायली गुपचूप आदींचा सक्रिय सहभाग लाभला.

युवक आघाडीमध्ये ओंकार भस्मारे, ओंकार वनपत्रे, अजिंक्य स्वामी, ॲड. योगीराज स्वामी, अभिषेक स्वामी, अक्षय मठपती, सोमनाथ हिरेमठ, अमर जंगम, अथर्व जंगम, समर्थ जंगम, अतुल जंगम, जयवंत येडेकर, सागर स्वामी, महारुद्र पुराणिक, अनिकेत जंगम स्वामी, गणेश जंगम, चंद्रकांत जंगम, प्रदीप जंगम, संजय विभूते, राजेश लोखंडे, राहुलकुमार स्वामी, संदीप जंगम, गिरीश स्वामी, विरेश मिटकरी, सर्वेश हिरेमठ, शुभम वसेकर, रोहित पुष्पलवार, शिवधन गुपचूप, सतीश जहागिरदार, संकेत वसेकर, रोहित भातकुटे, योगेश भस्मारे यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.

 

तसेच त्र्यंबकदादा लोखंडे, भीमा स्वामी, शशिकांत कुगावकर, अण्णया स्वामी, दिलीप वसेकर, गजानन जंगम, मल्लय्या स्वामी, राजशेखर नवनी, ओमप्रकाश जंगम, प्रकाश जंगम, आर. के. हिरेमठ, बी. एल. स्वामी, बसवराज हिरेमठ (माजी वन अधिकारी) तसेच काशिनाथ चिखले, राजेश चिट्टे, संतोष हिरोळी, संजय जंगम, शैलेश तोडकर, जगदीश स्वामी, श्रीकांत हिरेमठ, संतोष स्वामी (सीए), नितीन स्वामी, सुधाकर भस्मारे, चन्नबसय्या साळीमठ, दीपक जंगम, रमेश मिटकरी, मल्लिकार्जुन नावंदे सर, अण्णा अडागळे, भगवान कोठावळे, मल्लिकार्जुन सर्जे, राजन सुपेकर यांच्यासह अनेक मान्यवर कुटुंबांचा सन्मान करण्यात आला.

 

या प्रसंगी पुणे जिल्हा जंगम पुरोहित संस्था, पिंपरी-चिंचवड शहर जंगम संस्था, वीरशैव धारेश्वर सेवा संघ, श्री संत शिवगंगा माई बार्शीकर ट्रस्ट, लिंगायत सेवा संघ (सिंहगड रोड), श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी चॅरिटेबल ट्रस्ट (हडपसर), भिकूबाई मेनकुदळे ट्रस्ट, वीरशैव सेवा मंडळ (वडगाव शेरी) आणि श्री सिद्धेश्वर फाउंडेशन (कात्रज) या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक व देणगीदारांचे आभार मानण्यात आले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 


 Give Feedback



 जाहिराती