सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीकपात पूर्णपणे रद्द, खडकवासला धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठ्यामुळे मिटली चिंता
  • मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 शहर

'देवी मार्गम् ' भरतनाट्यम नृत्याविष्कार ८ ऑगस्ट रोजी

डिजिटल पुणे    04-08-2026 12:56:30

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत नृत्यांजली डान्स अकादमी, पुणे यांच्यातर्फे 'देवी मार्गम्' भरतनाट्यम नृत्याविष्कार शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता, पुणे येथे सादर होणार आहे.या कार्यक्रमात नृत्य प्रशिक्षक  स्मिता सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या ३८ विद्यार्थिनी पारंपरिक भरतनाट्यम मार्गम् सादर करणार आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेतील विविध अंगांचे दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणातून देवीच्या विविध रूपांचे, भावांचे आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी दर्शन रसिकांना अनुभवता येणार आहे.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा ३०० वा कार्यक्रम असून सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचा दर्जेदार अनुभव घेण्यासाठी पुणेकर रसिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती