सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील कोथरूड कथित भोंदू बाबा प्रकरणात मुख्य आरोपी दीपक खडकेचा जामीन पुणे न्यायालयाकडून रद्द
  • दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंड इथं अंत्यसंस्कार सुरू
  • शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
  • काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
  • मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
 शहर

मोहोळ महाविद्यालयात नशा मुक्त भारत अभियान

डिजिटल पुणे    04-08-2026 12:58:58

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पौड रोड पुणे येथे केंद्र शासनाच्या नशा मुक्त भारत अभियान या उपक्रमांतर्गत अंमली पदार्थ विरोधी समिती मार्फत विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थ विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत याची सुरुवात विद्यार्थ्यांना अमली पदार्थ न घेण्याची सामूहिक शपथ देण्यात आली यानी सुरुवात झाली. या वेळी डॉ.श्रीनिवास ईपलपल्ली, डॉ. शोभा तितर, डॉ. प्रकाश हुंबाड, डॉ. हिमालया सकट, प्रा. संतोष मोरे, डॉ. रुपाली शेंडकर, डॉ. आदिनाथ पाठक उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. श्रीनिवास ईपलपल्ली म्हणाले अमली पदार्थांचा अति वापर ही एक अशी समस्या आहे जी देशाच्या सामाजिक जडणघडणीवर विपरित परिणाम करत आहे. कोणत्याही अमली पदार्थावर अवलंबित्वामुळे व्यक्तीच्या आरोग्यावरच केवळ परिणाम होत नाही तर त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण समाजही विस्कळीत होतो.

विविध मनोविकारी पदार्थांचे सतत सेवन केल्याने व्यक्तीचे त्यावरील अवलंबित्व वाढते. काही पदार्थांच्या सेवनामुळे  न्यूरो-मानसिक विकार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, तसेच अपघात, आत्महत्या आणि व्यक्ती हिंसक होणे असे प्रकार होऊ शकतात. म्हणून, अमली पदार्थांचा वापर आणि अवलंबित्व याकडे मानसिक-सामाजिक-वैद्यकीय समस्या म्हणून पाहण्याची गरज आहे. उपक्रमाचे आयोजन अंमली पदार्थ विरोधी समिती प्रमुख डॉ अशोक शेळके, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख डॉ रुपाली शेंडकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष मोरे, कार्यालय प्रमुख आशिष परमार यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती