सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील कोथरूड कथित भोंदू बाबा प्रकरणात मुख्य आरोपी दीपक खडकेचा जामीन पुणे न्यायालयाकडून रद्द
  • दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंड इथं अंत्यसंस्कार सुरू
  • शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
  • काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
  • मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
 शहर

बोर्डगेम आणि पत्त्यांच्या अभिनव माध्यमातून शेतकरी शिकणार १०० हून अधिक पिकांवरील प्रक्रिया ! महाएफपीओ फेडरेशन आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स यांच्यात सहकार्य करार

डिजिटल पुणे    05-08-2026 14:07:01

पुणे: शेतकऱ्यांना विविध पिकांवरील मूल्यवर्धन आणि प्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अधिक सोपे, रंजक आणि परिणामकारक पद्धतीने देण्यासाठी महाएफपीओ फेडरेशनने एक अभिनव पाऊल उचलले आहे. पारंपरिक प्रशिक्षण पद्धतींना आधुनिक शैक्षणिक संकल्पनेची जोड देत फेडरेशनने बोर्डगेम आणि माहितीपूर्ण पत्त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी पुण्यातील मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा. लि. या संस्थेसोबत सहकार्य करार करण्यात आला.दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथील महाएफपीओ फेडरेशनच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात फेडरेशनचे कार्यकारी संचालक डॉ.संजय पंढारे आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संचालक मंदार नामजोशी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी निर्मिती नामजोशी तसेच महाएफपीओ फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.

महाएफपीओ फेडरेशन हे महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्या , शेतकरी उत्पादक संस्थांआणि सहकारी संस्थांची एक प्रमुख शिखर संस्था (Consortium) आहे. याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. ते शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, प्रक्रिया उद्योग, ब्रँडिंग आणि विपणन यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या उपक्रमामुळे फेडरेशनच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना अधिक प्रभावी आणि अनुभवाधारित स्वरूप प्राप्त होणार आहे.महाएफपीओ फेडरेशन (MAHAFPO Federation) शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (FPOs) माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमालावर प्रक्रिया  आणि मूल्यवर्धन (Value Addition) करण्याचे विशेष प्रशिक्षण देते. कच्चा शेतीमाल थेट न विकता त्यावर प्रक्रिया करून तो बाजारात कसा विकावा, याचे पद्धतशीर मार्गदर्शन याद्वारे केले जाते.अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन,काढणीपश्चात व्यवस्थापन,व्यवसाय नियोजन,शासकीय योजना आणि परवाने,तंत्रज्ञान आणि बाजारपेठ जोडणी यांचा त्यात समावेश आहे.हे प्रशिक्षण वर्षभर जिल्हा पातळीवर सुरु असते.

या प्रकल्पाअंतर्गत सुमारे १०० हून अधिक पिकांच्या प्रक्रिया साखळीचे प्रशिक्षण बोर्डगेम आणि विशेष डिझाइन केलेल्या माहितीपूर्ण पत्त्यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. प्रत्येक पिकाच्या प्रक्रियेतील टप्पे, आवश्यक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण, मूल्यवर्धन, साठवणूक, पॅकेजिंग आणि बाजारपेठेपर्यंतचा प्रवास खेळाच्या स्वरूपात समजावून सांगितला जाणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष सहभागातून शिकण्याचा अनुभव शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेतीमध्ये प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व सातत्याने वाढत असताना ग्रामीण भागातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, महिला बचत गट, कृषी उद्योजक आणि युवक यांच्यासाठी ही प्रशिक्षण पद्धती विशेष उपयुक्त ठरणार आहे. कमी वेळेत अधिक प्रभावी पद्धतीने माहिती आत्मसात करण्यास या उपक्रमाची मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.मॅप एपिक कम्युनिकेशन ही संस्था अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करण्यासाठी संगीतबद्ध पाढे, शैक्षणिक बोर्डगेम आणि अभिनव अध्ययन साधने विकसित करत आहे. त्याच अनुभवाचा उपयोग करून आता कृषी क्षेत्रासाठी विशेष प्रशिक्षण साहित्य विकसित करण्यात आले असून त्याद्वारे पिकांच्या प्रक्रिया तंत्रज्ञानाचे सुलभीकरण करण्यात आले आहे.

*शेतकऱ्यांचे प्रशिक्षण  होणार आनंददायी  – डॉ. संजय पंढारे*

"शेतकऱ्यांचे प्रशिक्षण केवळ व्याख्यानांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष सहभागातून आणि आनंददायी पद्धतीने देणे ही काळाची गरज आहे. बोर्डगेम आणि माहितीपूर्ण पत्त्यांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगातील प्रत्येक टप्पा सहज समजेल. मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योगात अधिकाधिक शेतकरी सहभागी व्हावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. देशभरात अशा स्वरूपाचा हा पहिलाच व्यापक उपक्रम ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.",असे  फेडरेशनचे सह-समन्वयक डॉ. संजय पंढारे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

"खेळ ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नसून ती अत्यंत प्रभावी शिक्षणपद्धती आहे. विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेल्या गेम-आधारित शिक्षणाचा अनुभव आता आम्ही कृषी क्षेत्रात आणत आहोत. प्रत्येक बोर्डगेम आणि प्रत्येक माहितीपत्रक शेतकऱ्याला प्रत्यक्ष प्रक्रियेचा प्रवास समजावून सांगेल. कृषी प्रशिक्षण अधिक सोपे, लक्षात राहणारे आणि व्यवहार्य बनविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल.",असा विश्वास मंदार नामजोशी यांनी व्यक्त केला.

महाएफपीओ फेडरेशनच्या या उपक्रमामुळे राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या क्षमता वृद्धीला चालना मिळण्याबरोबरच कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि ग्रामीण उद्योजकतेला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.१०० वेगवेगळ्या पिकांवर (धान्य, कडधान्ये, फळे आणि भाज्या) प्रक्रिया करून पीठ, डाळी, तेल, ज्यूस, जॅम, पावडर, ड्रायफ्रूट्स आणि रेडी-टू-ईट स्नॅक्स यांसारखी उच्च मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात. या प्रक्रियेमुळे शेतीमालाचे नुकसान टळते, पिकांची टिकवण क्षमता (Shelf Life) वाढते आणि शेतकऱ्यांना थेट बाजारात दर्जेदार ब्रँड म्हणून मोठी ओळख मिळते. महाएफपीओ फेडरेशनच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे अशा १०० हून अधिक पिकांवर स्वच्छता,प्रतवारी,निर्जलीकरण (Dehydration) आणि पॅकेजिंग करून ग्रामीण भागात मोठे प्रक्रिया उद्योग उभारणे शक्य आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार निर्माण करण्यासाठी एक गेम-चेंजर ठरेल.शेतकऱ्यांच्या कुटुंबातील झेन -जी  मुलांना शेतीचे आकर्षण निर्माण करण्यात सुद्धा याचा उपयोग होईल. 

 


 Give Feedback



 जाहिराती