सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील कोथरूड कथित भोंदू बाबा प्रकरणात मुख्य आरोपी दीपक खडकेचा जामीन पुणे न्यायालयाकडून रद्द
  • दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंड इथं अंत्यसंस्कार सुरू
  • शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
  • काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
  • मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
 जिल्हा

वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापनेचा प्रस्ताव तयार करा ;कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

डिजिटल पुणे    05-08-2026 17:32:28

मुंबई : कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणे आवश्यक आहे. या संस्थेमुळे कृषी संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापन करण्याबाबत कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. बैठकीला राज्यमंत्री योगेश कदम, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली चे कुलसचिव डॉ.संजय भावे, उपसचिव प्रतिभा पाटील यासह कृषी विभागाचे अधिकारी उप सचिव उपस्थित होते.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, वाकवली येथे मध्यवर्ती संशोधन केंद्रामध्ये पदव्युत्तर कृषी शिक्षण व संशोधनासाठी आवश्यक असलेले विस्तीर्ण क्षेत्र, संशोधनासाठी उपलब्ध प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा आणि लागवडीयोग्य जमीन उपलब्ध असल्याने या ठिकाणी पदव्युत्तर संस्था स्थापन करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. या संस्थेमुळे कृषी संशोधनाला चालना मिळण्याबरोबरच कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार असून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही गती मिळणार आहे.

पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था हा ऐतिहासिक प्रकल्प ठरेल – राज्यमंत्री योगेश कदम

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणासाठी वाकवली येथील पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था हा ऐतिहासिक प्रकल्प ठरेल. यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर भागात जावे लागणार नाही. संशोधन, कौशल्य विकास आणि स्थानिक कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही संस्था अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती