सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • विधिमंडळात पडलेली फूट ही राजकीय फूट मानायची का? ठाकरेंच्या वकिलांचा मोठा सवाल, शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात खल, लवकरच निकाल
  • पुण्यात वाहनांवर आता एमएच-12 ‘1A’; देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर मालिकेचा प्रस्ताव
  • शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
  • सिंहगड रस्त्यावरील कोंडीवर उपाययोजना : महापौरांचा १५ दिवसांत वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्याचा आदेश
 शहर

आमदार श्री राजेंद्र राऊत यांच्या भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा रविवार ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

डिजिटल पुणे    07-08-2026 11:02:05

पुणे : सोलापूर जिल्हा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता यमुना नगर, निगडी येथील सीझन्स बँक्वेट अँड लॉन्स येथे होणार आहे.

हा सत्कार सोहळा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री माधुरी मिसाळ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

कार्यक्रमास खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार भीमराव तापकीर,विधानपरिषद सदस्य उमा खापरे, विधानपरिषद सदस्य योगेश टिळेकर, विधानपरिषद सदस्य अमित गोरखे, तसेच ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना एकत्र आणून परस्पर संवाद, स्नेह आणि सामाजिक ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सोलापूरकरांना एकाच व्यासपीठावर आणण्याबरोबरच नव्याने निवडून आलेल्या आमदार राजेंद्र राऊत यांचा गौरव करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा मित्र मंडळाचे संयोजक ॲड अतुल पाटील, श्री दिनेश मोरे, श्री अजय करंडे, श्री बाळासाहेब बावकर, श्री अशोक घावटे इ. यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा- 96232 35454, 9960191733.

 


 Give Feedback



 जाहिराती