सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘भारताला थांबवण्याची ताकद कुणातही नाही’; तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना इशारा
  • लोहमार्गासाठी महामार्गावर क्रांतीची मशाल; सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांचे पुणे-नाशिक मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन
  • मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
  • मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
 शहर

खळदच्या महाआरोग्य शिबिरात अवयवदाते कुटुंबाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

डिजिटल पुणे    10-08-2026 12:29:21

बारामती : पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खळद येथे आयोजित महाआरोग्य शिबिरात अवयवदाते सुबनावळ कुटुंबीयांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मागील वर्षी इंदापूर तालुक्यातील कै. हिराबाई सुबनावळ यांचे ब्रेनडेड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पुत्र कैलास सुबनावळ यांनी अवयवदानासाठी सहमती दर्शविली. त्यांच्या या धाडसी आणि मानवतावादी निर्णयामुळे तब्बल पाच जणांना जीवनदान मिळाले.

यावेळी कैलास सुबनावळ यांनी, “जळून राख होण्यापेक्षा आईला अवयवदानरूपी जिवंत ठेवले,”अशी भावना व्यक्त केली. इंदापूर तालुक्यातील एका छोट्या गावातील कुटुंबाने घेतलेला हा सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी निर्णय समाजासाठी आदर्श ठरत आहे. या शिबिरात तब्बल ८ हजार ८८० लाभार्थींनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला. शिबिराततपासणीदरम्यान सुमारे २ हजार रुग्णांमध्ये विविध आजारांचे निदान झाले. या रुग्णांवर पुढील पंधरवड्यापासून महिनाभराच्या कालावधीत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचार उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत नियोजन करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबिरात अवयवदानाबाबत जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी अवयवदानाचे महत्त्व, त्यातून मिळणारे जीवनदान आणि समाजातील गैरसमज दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे महादेव मगर (संपर्क ९८५०५१२२२३) यांनी कळविली आहे


 Give Feedback



 जाहिराती