सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘भारताला थांबवण्याची ताकद कुणातही नाही’; तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना इशारा
  • लोहमार्गासाठी महामार्गावर क्रांतीची मशाल; सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांचे पुणे-नाशिक मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन
  • मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
  • मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
 जिल्हा

ठाण्यातील म्हाडाच्या चितळसर – मानपाडा येथील घरांच्या किमती कमी करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

डिजिटल पुणे    11-08-2026 17:20:34

ठाणे : ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किमती २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याबाबत यापूर्वी काढलेल्या सोडतीतील ४३४ विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित घरासाठी नव्या दराने सोडत काढावी,असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

चितळसर मानपाडा येथील म्हाडाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पातील ११७३ प्राप्त घरांपैकी ९३८ घरांची सोडत १४ जुलै २०२५ रोजी काढली. या सोडतीमध्ये २०२५-२६ च्या रेडी रेक्नर दराने घरांच्या किंमती आकारण्याचा निर्णय घेतल्याने याबाबत म्हाडा कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाली. या बैठकीला म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड आणि म्हाडाचे इतर प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी तसेच याबाबत तक्रार दाखल करणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यात प्रामुख्याने या घरांना २०२०-२१ साली अंशतः भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याने या घरांच्या किमती तेव्हा १० हजार रुपये प्रति चौरस फुटांच्या दराने म्हणजे ४४ लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र त्याला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र २०२५-२६ साली मिळाल्याने उर्वरित घरांची किंमत ५१ आणि ५२ लाखापर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे एकाच इमारतीत राहणाऱ्या दोन सदनिकाधारकांकडून सारख्याच जागेच्या सदनिकेसाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याने या दरामध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी सदनिकाधारकांनी केली.

त्यामुळे एकाच इमारतीत सारख्याच क्षेत्रफळाच्या घरांच्या वेगवेगळ्या किमती आकारण्यापेक्षा सरसकट २०-२१ चा रेडी रेकनर दर ग्राह्य धरून किंमत करून आकारण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालकांना दिले. यासोबतच या गृह प्रकल्पातील सोडतीमध्ये ज्या ४३४ लाभार्थ्यांनी आपली स्वीकृती पत्रे म्हाडाकडे जमा केली आहेत त्यांना दिलासा द्यावा, तर उर्वरित घरांसाठी नवीन दरानुसार नव्याने लॉटरी काढण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले. त्यामुळे आता या गृहप्रकल्पातील घरांची नव्याने सोडत होणार असून २०२०-२१ च्या रेडी रेकनर दराप्रमाणे म्हणजे ४४ ते ४६ लाखात ती नागरिकांना उपलब्ध होतील.


 Give Feedback



 जाहिराती